हा आहे भारतातील 'सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग' भारतात राष्ट्रीय महामार्गाचं मोठं जाळं विस्तारलं आहे काही महामार्ग जिल्ह्यांना जोडणारे तर काही राज्यांना जोडणारे पण भारतातील सर्वात लांब महामार्ग देशाच्या उत्तर आणि दक्षिण प्रांतांशी जोडतो राष्ट्रीय महामार्ग 44 हा भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे पूर्वी NH 7 म्हणून या महामार्गाला ओळखले जात असे NH 44 हा उत्तरेकडील श्रीनगर ते दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत आहे NH1, NH1A, NH2, NH3, NH75, NH26, अशा राष्ट्रीय महामार्गांचे पूर्ण किंवा काही भाग विलीन करून ते अस्तित्वात आले या महामार्गाची एकूण लांबी 3745 कि.मी. इतकी आहे NH 44 हा एकूण 11 राज्ये आणि जवळपास 30 मोठ्या शहरांना जोडतो या महामार्गामुळे उत्तर - दक्षिण भारतात दळणवळण सोयिस्कर झाले आहे