हे आहेत वयाची पासष्टी पार केलेल्या लोकसंख्येचं जगातील प्रमाण

मोनॅको हा अतिश्रीमंतांचं वास्तव्य असलेला अगदी चिमुकला देश.

या देशात वयाची पासष्टी ओलांडलेल्या लोकसंख्येचं प्रमाण आहे तब्बल 36%.

जगातला सर्वाधिक वेगाने वृद्धत्वाकडे झुकत चाललेला देश म्हणून मोनॅको गेली अनेक वर्षे अग्रस्थानी आहे.

त्यामागोमाग जपान 30% वरील लोकसंख्या पासष्टी पार केलेली असुन जन्मदरही अधिक वेगाने घसरत चालला आहे.

त्यानंतर इटली 24%, जर्मनी 22 % फ्रान्स 21% या देशांचा नंबर लागतो.

वृद्ध लोकसंख्येचं प्रमाण जास्त असलेल्या देशांच्या यादीत प्रामुख्याने युरोपीय देश दिसतात.

सर्वांत कमी वृद्ध लोकसंख्येचं प्रमाण हे पाकिस्तानचा क्रमांक लागतो. ते प्रमाण आहे 4%

तर भारत आणि इराण चा शेवटवून दुसरा क्रमांक लागत असून वृद्ध लोकसंख्येचं प्रमाण 7% इतकं आहे.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन कंट्रोल आणि द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या नोव्हेंबर 2023 ची हि आकडेवारी आहे.