मनापासून पाहिलेली आणि जीवापाड मेहनत घेतलेली स्वप्न पूर्ण होतात



असंच काहीसं 18 डिसेंबर 2022 रोजी फुटबॉल जगतात झालं.



जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाचा सर्वात प्रसिद्ध खेळाडू फुटबॉलर लिओनल मेस्सीनं अखेर फिफा विश्वचषक उंचावला



फायनलमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सला पेनल्टी शूटमध्ये 4-2 नं मात देत वर्ल्डकपवर नाव कोरलं



या विजयासह मेस्सीच्या फुटबॉल कारकिर्दीतील एक मोठं स्वप्न पूर्ण झालं



वयाच्या 10 व्या वर्षी गंभीर आजारानं ग्रासल्यानंतर त्यावरही मेस्सीनं मात केली.



पण त्यावरही मात करत मेस्सी फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट बनला



क्लब फुटबॉलमध्ये 17 वर्षे बार्सिलोना संघाकडून मेस्सीनं कमाल कामगिरी करत अनेक पुरस्कार जिंकले.



सर्वाधिक म्हणजेच 7 वेळा फुटबॉल जगतातील सर्वात महान पुरस्कार बलॉन डी ऑर मेस्सीनंच पटकावला आहे.



आता अर्जेंटिनालाही जागतिक फुटबॉलमध्ये अव्वल दर्जाचा संघ बनवत मेस्सीनं वर्ल्ड कप जिंकून दिला आहे.