फिफा विश्वचषक 2022 मध्ये फ्रान्सने पोलंडचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एमबाप्पेने शानदार खेळ दाखवत दोन गोल केले. या दोन गोल्सच्या जोरावर कायलिननं मोठा विक्रम केला. महान फुटबॉलर पेले आणि रोनाल्डोसारख्या खेळाडूंचे विक्रम कायलिननं मोडीत काढले. तर लिओनेल मेस्सीच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली एमबाप्पेने विश्वचषक कारकिर्दीत केवळ 11 सामन्यांत 9 गोल केले आहेत. त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकलं आहे. रोनाल्डोने वर्ल्डकपच्या 20 सामन्यात 8 गोल केले आहेत. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या विशेष विक्रमाशी एमबाप्पेने बरोबरी केली आहे. एमबाप्पेच्या नावावर त्याच्या विश्वचषक कारकिर्दीत 9 गोल असून मेस्सीनेही वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 9 गोल केले आहेत. पण एमबाप्पे ज्या प्रकारच्या फॉर्मात आहे, ते पाहता तो लवकरच मेस्सीलाही मागे टाकू शकतो.