दिवसेंदिवस कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच त्याचे नवनवे प्रकारही समोर येत आहे
सध्या महिलांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर गर्भाशयचा कर्करोग आढळतो.
स्त्रियांच्या अंडाशयात होणाऱ्या कर्करोगाला ओव्हेरियन कॅन्सर म्हणतात.
हा कर्करोग हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतो. आणि याची लक्षणे लवकर दिसु येत नाही. म्हणून याला सायलेंट किलर म्हणतात.
वारंवार पोटदुखी, बद्धकोष्ठता समस्या, मूत्रविसर्जन, ओटीपोटाच्या आकारात वाढ
असामान्य योनि स्राव.अनियमित रक्तस्त्राव,भूक न लागणे,वजन कमी होण,पाठदुखी, थकवा.
सकस आहार घ्या तुमच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करा.
रोज व्यायाम करा नियमित व्यायामाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
धूम्रपान आणि मद्यपान करू नका. यामुळे कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
नियमित तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरुन काही समस्या असल्यास ते वेळेत ओळखता येईल.
गर्भाशयाचा कर्करोग का होतो याचे कोणतेही ठोस कारण माहीत नाही.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )