सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते.



हे एक ताजेतवाने पेय आहे ज्याचे सेवन केल्याने तुमचा मूड फ्रेश राहतो.



सकाळी कोमट पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात लिंबाचा रस मिसळून प्यावा.



लिंबू पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते .



लिंबू हे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चे चांगले स्त्रोत मानले जाते.



लिंबू पाण्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात.



रिकाम्या पोटी लिंबाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.



लिंबामध्ये फायबर असते ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते व तुम्हाला लवकर भूक लागत नाही.



नियमितपणे लिंबाचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक येते.



मात्र अतिप्रमाणात लिंबाचे सेवन केल्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात.