आजकाल परफ्यूम वापरणे हा एक फॅशन चा भाग आहे. सुगंधी वास येण्यासाठी आजकाल प्रत्येकजण परफ्यूम वापरतो. मात्र डोळ्याभोवतीची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते,त्यामुळे डोळ्याभोवती परफ्यूम वापरू नये. अंडरआर्म्समध्ये परफ्यूम लावणे टाळा त्यामुळे केवळ जळजळच नाही तर पुरळ उठणे तसेच त्वचा काळी पडणे ह्या समस्या उद्भवतात. कानाभोवती परफ्यूम लावू नका,कारण परफ्यूम मधील रसायने कानाच्या आतील त्वचेला इजा करू शकतात. परफ्यूममध्ये अल्कोहोल आणि इतर अनेक घातक रसायने असतात जे शरीरच्या नाजुक भागांना संवेदनशील करू शकतात . मनगट,मान आणि छाती यांसारख्या भागांवर तुम्ही पर्फ्यूम लावू शकता. शरीराच्या या अवयवांजवळ परफ्युम लावल्यास सुगंध पसरण्यास मदत होते व तासन् तास सुगंध तसाच राहतो. पर्फ्यूम जास्त काळ टिकण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझ करा. हायड्रेटेड त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्याने परफ्यूम तासन्तास टिकू शकतो.