लहान मुलांकडून किंवा आपल्याकडून चुकून मोबाईल पाण्यात पडतो किंवा पावसात भिजतो. अशावेळी योग्य काळजी न घेतल्यास तुमचा मोबाईल खराब होऊ शकतो. मोबाईल पाण्यात पडला असेल किंवा भिजला असेल तर शक्य तितक्या लवकर तो पाण्यातून बाहेर काढा. मोबाईल त्वरित बंद करा आणि तुमच्या मोबाईलची बॅटरी काढता येणं शक्य असेल, तर काढून ठेवा. कोरड्या फडक्याने मोबाईल पुसून घ्या आणि थोडावेळ मोकळ्या हवेत किंवा फॅनखाली ठेवा. मोबाईलमधील सिमकार्ड आणि मेमरी कार्ड काढून ठेवा. यानंतर मोबाईल तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा. तांदूळ ओलावा वेगाने शोषून घेतो. साधारणपणे 24 तासानंतर मोबाईल तांदळाच्या डब्यामधून बाहेर काढा आणि सर्व्हिस सेंटरला भेट द्या. (वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )