महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारीचे पीठ आणि बेसनापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले जाते. थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम वरील प्रमाणे सर्व प्रकारचे पीठ एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्या. त्यानंतर त्या एकत्रित केलेल्या पिठात बारीक चिरलेला कांदा, धना पावडर, हळद, लाल तिखट व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या. त्यानंतर अंदाजाने पाणी घालून हे मिश्रण मळून घ्या. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही असे मध्यम स्वरूपात हे मळून घ्या. त्यानंतर हे पिठाचा गोळा हातावर घ्यावा व हातावर काही प्रमाणात तेल आणि थोडे पाणी लावावे. त्यानंतर तवा हलक्या प्रमाणात गरम झाल्यावर त्यावर थोडेसे तेल सोडावे व त्या तव्यावरच हे थालपीठ माखून घ्यावे. त्यानंतर 5 ते 7 मिनिट या थालपीठाला वाफू द्यावे आणि त्यानंतर दही ठेचा बरोबर गरमागरम थालपीठ खाऊ शकता. (वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )