सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. तुम्हीही सनस्क्रीन लावत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, ऋतू कोणताही असो आपल्याला सनस्क्रीनची गरज असते. SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर, याचा अर्थ सनस्क्रीन तुमच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून किती काळ संरक्षण करेल. जसजसे एसपीएफ मूल्य वाढते तसतसे सनबर्न संरक्षण वाढते. SPF जितका जास्त असेल तितका संरक्षण जास्त काळ टिकेल. SPF 50 UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून व्यापक स्पेक्ट्रम संरक्षण देते. तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये सनस्क्रीनचा समावेश करायला विसरू नका. पावसाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक गंभीर समस्या वाढतात. जर तुम्ही पावसाळ्यात सनस्क्रीन लावणे बंद केले असेल तर ते अजिबात करू नका कारण त्यामुळे तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकते.