केसांसाठी एक घरगुती उपाय म्हणजे आवळा
बदलेल्या जीवनशैलीमुळे केस गळती ही समस्या खूपच सामान्य आहे.
आवळा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
हे तुरट व आंबट चवीचे, हिरव्यारंगाचे अत्यंत औषधी फळ आहे.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी आणि टॅनिन नावाचे गुणधर्म आहेत.
आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुमच्या केसांना मजबूत करतात.
ज्यामुळे तुम्हाला केस गळण्यापासून आराम मिळतो.
आवळ्याचा रस केसांमध्ये लावल्याने केसांची वाढ व केस चमकदार होण्यास मदत होते .
खाण्याच्या माध्यमातून तुम्ही केसांसाठी आवळा वापरू शकता.
इतकंच नाही तर आवळा तुमच्या टाळूमध्ये मेलेनिन वाढवण्यास मदत करतो जेणेकरून तुम्ही पांढऱ्या केसांची समस्या टाळू शकता.