चेहऱ्यावर येणारे डाग आणि पिंपल्स चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त राहतात.
मात्र जायफळाचा वापर करून तुम्ही काही दिवसातच तुमचा चेहरा मुलायम आणि चमकदार बनवू शकता.
जायफळ फक्त खाण्यासाठीच स्वादिष्ट नसून त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानले जाते.
यामध्ये अँटिऑक्सिडेंट जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी, चमकदार आणि मुलायम बनण्यास मदत होते.
जायफळ घालून तुम्ही फेस पॅक बनवू शकता. दही, मध आणि जायफळ मिसळून तयार केलेला फेस पॅक वापरल्याने त्वचा चमकदार बनते.
जर तुम्हाला हायपरपिगमेंटेशनची समस्या असेल तर तुम्ही जायफळचा वापर करू शकता.
जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर जायफळ वापरत असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावरील सूज कमी करेल.
जायफळ तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास आणि चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
जायफळात मायरीस्टिसिन है सक्रिय कंपाऊंड असते ज्यात अँटी बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते.
मात्र जायफळ वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या, कारण काही लोकांना त्याची ॲलर्जी असू शकते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)