पिंपल्स चेहऱ्याचे सौंदर्य हिरावून घेतात. आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला मुरुमांमुळे त्रास होतो. चेहऱ्यावर मुरुम दिसण्याची अनेक कारणे असू शकतात. सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली. मुरुम फोडल्याने ते लवकर बरे होतात, असा अनेक लोकांचा गैरसमज आहे. मुरुम फोडणे किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याने ही समस्या आणखी वाढू शकते. मुरुमांच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा मुरुम येतात तेव्हा ते स्वतःच बरा होऊ द्या. मुरुमाला वारंवार स्पर्श केल्याने, तुमच्या हातातील जंतू मुरुमांभोवतीच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. जर ते नैसर्गिकरित्या बरे झाले तर त्वचेवर कोणतेही डाग दिसत नाही.