ड्रॅगन फ्रूट हे फळ आहे. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. सगळ्यात आधी तर ड्रॅगन फ्रुटचे मागचे आणि पुढचे देठ काढून घ्या. त्यानंतर ते फळ उभे करा आणि त्यावर एक उभा हलकासा छेद द्या. बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूनेही एक हलकासा छेद द्या. आता जिथून छेद दिला आहे तिथून त्याचे साल काढा. अलगदपणे सालं निघून गेल्यावर तुम्हाल पाहिजे त्या आकाराच्या फोडी करा. ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेसाठी ते पोषक ठरते. या फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ते पचनासाठी चांगले असते. लो कॅलरी फ्रुट म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्यांसाठीही उपयुक्त. प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सही या फळामध्ये भरपूर असतात.