तरीही लोक व्हॅलेंटाईन डेची आतुरतेने वाट पाहतात.
व्हॅलेंटाईन डे ला अनेकजण आपल्या प्रिय व्यक्तीसमोर आपलं प्रेम व्यक्त करत असतात.
या दिवशी भेटवस्तू देण्याचा आणि घेण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे.
हे 5 गिफ्ट्स अतिशय उपयोगाचे आहेत.
स्मार्टवॉचचा उपयोग फक्त वेळ बघण्यापूर्ता नसून सर्व गोष्टी ट्रॅक करता येतात. फोन मधील नोटिफीकेशन आपण सहजपणे बघू शकतो. स्मार्टवॉचमध्ये अनेक फिटनेस फिचर्स असतात.
स्मार्ट बँडमध्ये 100+ वर्कआउट मोड आहेत. त्याचबरोबर आरोग्य केंद्रित सेन्सर आहेत.
जर तुमच्या जोडीदाराला गाणी ऐकण्याची आवड असेल तर, वायरलेस बड्स भेटवस्तू देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
प्रवासात अनेक वेळा पॉवर बँक कामी येतात, अशा वेळी तुम्ही व्हॅलेंटाईन गिफ्टमध्ये पॉवर बँक गिफ्ट देऊ शकतात.
इन्स्टॅक्स कॅमेराने फक्त 90 सेकंदात फोटो तुमच्या हातात मिळणार.