घरामध्ये ही रोपं लावणं फार शुभ संकेत मानलं जातं. ही रोपं घरात लावल्यास आर्थिक अडचण भासणार नाही. वास्तूशास्त्रानुसार ज्या घरामध्ये ही रोपं लावली जातात त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. या रोपांमुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा आणि आशीर्वाद कायम असतो. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप असणं शुभ संकेत मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण असते. मनी प्लांट घरात लावणं खूप शुभ मानलं जातं. घरात मनी प्लांट लावल्यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होते. घरात मनी प्लांट लावल्यानंतर आर्थिक अडचणी दूर होतात. वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये बांबूचे रोप लावणं खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख:शांती राहते. ज्या घरात बांबूचे रोप असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा असते आणि धन-संपत्तीमध्ये वाढ होते.