या सोहळ्यासाठी लोक लाखो रुपयांचा खर्च करतात.
यासाठी दाग-दागिने, कपडे, तसेच विविध वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.
सध्या इंग्रजीत लग्नपत्रिका छापली जाते.
या पत्रिकेवर मॅरेज सेरेमनी किंवा वेडिंग सेरेमनी असं लिहीलेले असते.
वेडिंग आणि मॅरेज याचा एकच अर्थ समजत असाल तर तुमची ती चूक आहे.
मॅरेज म्हणजे दोन व्यक्तींमधील नातं आहे जे आयुष्यभर निभवावे लागते. विवाहाच्या माध्यमातून पती-पत्नींमध्ये एक नव नातं तयार होते यालाच मॅरेज असं म्हणतात.
वेडिंग म्हणजे लग्नाची विधी, पूजा व प्रथा असतात वधू-वरांना नातेवाईकांकडून आशीर्वाद मिळतात.
वेडिंग म्हणजे ज्यात सर्व विधी नातेवाईकांच्या साक्षीने होतात आणि वर-वधू विवाहबंधनात अडकतात.
लग्न झाल्यानंतर जोडप्याला हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी मेसेज करावा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.