जर तुम्ही एसी योग्य तापमानावर ठेवला, तर वीजबिल वाचेल. एका अभ्याानुसार, आपल्या शरीरासाठी योग्य तापमान 24° सेल्सियस आहे. जर तुम्ही एसी 24 डिग्रीवर चालवला, तर वीजबिल कमी येईल.
अनेकदा लोक फक्त रिमोटने एसी बंद करतात, पण मुख्य स्विच बंद करत नाही. फक्त रिमोटने बंद केल्याने एसी पूर्णपणे बंद होत नाही. त्यामुळे मुख्य स्विच बंद करणेही तितकेच गरजेचे आहे.
रात्री झोपताना एसी वापरत असाल, तर टायमर सेट करा. ठराविक वेळेनंतर एसी आपोआप बंद होईल आणि वीजबिल कमी येईल.
एसी वापरत असताना खोलीतील खिडक्या आणि दरवाजे नीट बंद करा. त्यामुळे थंडी हवा खोलीत टिकून राहील आणि एसी जास्त वेळ चालवण्याची गरज भासणार नाही.
एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घेतली तर त्याचा कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो