कामाच्या ताणामुळे अनेकांना दिवसातून खूपवेळा चहा कॉफी प्यावी लागते.
जागरण झाल्याने डोळ्यांवर ताण पडतो आणि ओघानेच डोळ्यांखालची त्वचाही काळी पडते.
भरपूर पाणी पिणे हा त्वचेच्या हायड्रेशनचा सर्वात चांगला उपाय आहे.
बटाटा बारीक किसून त्याचा रस काढून तो काळ्या वर्तुळाभोवती लावावा किंवा बटाटाच्या चकत्या डोळ्यांवर 10 मिनिटे ठेव्याव्यात.