त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी बरेच लोक खर्च करून ट्रीटमेंट्स घेत असतात, मात्र ही पेयं तुमच्या चेहऱ्यासोबतच तुमच्या आरोग्यालाही फायदेशीर ठरू शकतात.
सकाळी रिकाम्या पोटी ही पेयं प्यायल्याने त्वचेला व शरीराला हायड्रेशन मिळते.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे चयापचय सुधारते व मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होते.
कोरफडमध्ये जीवनसत्त्वे ई, सी आणि बी, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम असते जे आरोग्यासाठी व त्वचेसाठी चांगले असते.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते,जे तुमच्या त्वचेला टवटवीत ठेवते आणि मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेला फायदेमंद ठरतात.
नारळ पाणी चेहऱ्याला हायड्रेटेड ठेवते आणि कोरड्या त्वचेला फायदेशीर ठरते.
गाजरमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात आणि बीटरूट आतड्याची हालचाल सुलभ करते, यकृताचे कार्य वाढवते व त्वचा तरुण आणि तेजस्वी दिसण्यास मदत करते.
काकडी आणि पालक रस मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि यात अँटिऑक्सिडंट्स चे प्रमाण ही असते, हा रस नियमितपणे प्यायल्याने पिगमेंटेशन, मुरुमांचे डाग, वृद्धत्वाची चिन्हे आणि काळे डाग दूर राहतील.
चिया सिड्समध्ये ओमेगा-6 आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात, चिया सिड्स त्वचेसाठी खूप हायड्रेटिंग असते. चिया सिड्समुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
सकाळी नियमितपणे मॉर्निंग ड्रिंक ची सवय तुमच्या शरीराला व चेहऱ्याला निरोगी व चमकदार ठेवेल.