डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळ (Dark circles) ही आता एक सामान्य समस्या बनली आहे.
दीर्घकाळापर्यंत धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने डोळ्याखाली डार्क सर्कल्स येऊ शकतात.
काही लोक डोळ्यांखालील काळी वर्तुळे ही थकवा व खराब जीवनशैली समजून दुर्लक्ष करतात.
अपूर्ण झोप हे डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark circles) चे मोठे कारण आहे.
ॲलर्जीमुळे डोळ्यांच्या खाली जळजळ होते व खाज येते त्यामुळे काळी वर्तुळे तयार होतात.
अशक्तपणामुळे आणि शरीरातल्या लोहाच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली डार्क सर्कलसारखी दिसू लागतात.
व्हिटॅमिन के,बी12 व ई यासारख्या आवश्यक पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे डार्क सर्कल वाढू शकतात.
अपुऱ्या प्रमाणात पाणी पिणे हे एक मोठे कारण आहे त्यामुळे नेहमी हायड्रेट राहा.
जास्त वेळ मोबाईल लॅपटॉप ह्यासारख्या गोष्टी वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो ज्यामुळे काळी वर्तुळे निर्माण होतात.
सूर्यप्रकाश डोळ्यांच्या खालच्या भागावर परिणाम करतो त्यामुळे नेहमी तीव्र सूर्यप्रकाशात जाणे टाळा.