टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे.
याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
टोमॅटोचे दर हे 80 ते 100 रुपये किलोवर पोहोचले आहेत.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 27 जुलै रोजी दिल्लीत टोमॅटोची किरकोळ किंमत 77 रुपये प्रति किलो होती.
गुणवत्तेनुसार आणि स्थानानुसार, काही भागात दर 80 रुपये किलोपेक्षा जास्त झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो उत्पादक भागात मुसळधार पावसामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
NCCF ने दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो विक्रीचा मेगा सेल 29 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे.
एनसीसीएफच्या मते टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे सरकार चिंतेत आहे.
टोमॅटोचे भाव वाढण्यास प्रतिकूल हवामान जबाबदार धरले जात आहे.
उष्णतेच्या लाटेनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे भाव वाढत आहेत.