आंब्यात खूप पोषकतत्वं आहेत. त्यामुळं आंबा शरीरासाठी फायदेशीर ठरतो. आंब्यामध्ये विटामिन A, C असतं. आंब्यामध्ये प्रोटीन, पोटॅशियमदेखील मुबलक प्रमाणात असतं. आंबा आणि इतर पोटॅशियमयुक्त पदार्थ दररोज खाल्ल्यानं हृदय आणि रक्तवाहिन्यांशीसंबंधी आजार दूर राहतात. ज्या लोकांना किडनीचा आजार (CKD) आहे, त्यांनी मात्र पोटॅशियमचं अधिक सेवन टाळावं. जास्त प्रमाणात आंब्यांचं सेवन केल्यानं पोटदुखी, अपचन आणि अतिसार (Diarrhea) यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. गोड, चवदार आंबा खाल्यानं शरीरातील साखरेची पातळी पटकन वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहींनी आबां खाल्यानं त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एकाच वेळी खूप आंबे खाल्ल्यानं वजनही वाढू शकतं. आंब्यामध्ये कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढतं. आंब्याचं जास्त सेवन केल्यानं पोटाच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.