अदिती राव हैदरी ही एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकतीच ती संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या चित्रपटात दिसली होती.
या चित्रपटातील तिचा गजगामिनी वॉकने चाहत्यांना आकर्षित केलं.
नुकत्याच पार पडलेल्या 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येसुद्धा अदितीने हा तिचा फेमस वॉक ऑन पब्लिक डिमांड केला होता.
या अवॉर्ड शोसाठी अदितीने खास मस्टर्ड कलर फुलांचा फ्लोरल ड्रेस परिधान केला होता.
या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती.
त्यात तिचा मेकअपही अगदी साधा असल्यामुळे त्याला आणखी ग्लॅमरस लूक आला.
या ड्रेसला साजेसे असे गोल्डन कलरचे ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला.
अतिशय साधा, कम्फर्टेबल आणि सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसाला अगदी साजेसा असा हा अदितीचा लूक तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होता.
अदितीने आजवर अनेक हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सोशल मीडियावरही ती चांगलीच अॅक्टिव्ह असते.
अदितीचे आतापर्यंत 11.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.