चेहऱ्यावरील टॅन दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

5 चमचे ग्लिसरीनमध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून तयार केलेलं मिश्रण चेहऱ्याला, मनेल लावा, अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

2 चमचे बेसनमध्ये चिमूटभर हळद, दूध घालून तयार मिश्रण चेहऱ्याला लावून काही वेळाने थंड पाण्याने धुवा.

मुलतानी मातीमध्ये चमचाभर कोरफडीच गर, गुलाबपाणी घालून तयार केलेली पेस्ट चेहऱ्याला, मानेला लावा, 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

पपई चा गर आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लवल्यानेही त्वचेवरचा काळपटपणा दूर होतो.

टेमॅटोचा गर कढून त्याने चेहरा, मान, हातावर मसाज केल्याने टॅनिंग कमी होईल.

मलई आणि बेसन एकत्र करून तयार केलेली पेस्ट लावल्यानेही टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

त्वचेवर काळपटपणा कमी करण्यासाठी टेमॅटोचा गर आणि लिंबुचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावावा.

डाळिंबासोबत लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने टॅनिंग लवकर दूर होते.

महागडे ट्रीटमेंटवर खर्च करण्या पेक्षा घरच्या घरी उपाय करून बघा

तुम्ही नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपण दूर करू शकता.