श्रावण अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो.
भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे.
श्रावणात अनेक देवी-दैवतांची पूजा केली जाते.
हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्या कारणाने अनेक व्रत-वैकल्ये, उपवास केले जातात.
महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 05 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे.
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिना सुरु होणार आहे.
यावेळी 5 श्रावणी सोमवार येणार आहेत.
श्रावण महिन्यात मंगळागौर पूजन, नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा यांसारखे सण-उत्सव साजरे केले जात असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे.
या महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेला महत्त्व आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)