हिंदू धर्मात श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो.
हिंदू धर्मात या महिन्यात मांसाहार आणि मद्यपान केलं जात नाही.
श्रावण महिन्यात मांसाहार किंवा मद्यपान केल्याने यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतो.
श्रावण महिन्यात शरीराची रोगप्रतिकरक शक्ती कमकुवत होते त्यामुळे मांस, अल्कोहोल, मसालेदार पदार्थ पचायला कठीण जातात.
पचनक्रिया मंदावल्यामुळे या ऋतूत शाकाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
श्रावण हा महिना प्राण्यांच्या प्रजननाच्या महिन्याशीही संबंधित आहे.
जर आपण गर्भवती प्राण्याचे मांस खाल्ले तर आपल्या शरीरातील हार्मोन्समध्ये गडबड होऊ शकते.
पावसाळ्यात मांसाहार खाल्ल्याने संसर्गजन्य आजारांना बळी पडण्याचा धोका वाढतो.
यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )