वाढत्या वयासोबत गुडघेदुखी हैराण करते. गुडघेदुखीमुळे चालणं, उठणं आणि बसणं अशक्य होतं पण घरच्या घरी काही सोप्या उपायांनी तुम्ही गुडघेदुखीपासून झटपट आराम मिळवू शकता गुडघेदुखी, सांधेदुखीनं हैराण असाल तर हळदीचा आहारात समावेश करा हळदीमधील पोषक घटक गुडघेदुखीपासून आराम देतात आल्यामध्ये अॅन्टी-एम्फ्लिमेंटरी गुणधर्म आणि अॅन्टी-ऑक्सिडंट्स असतात. आल्यातील गुणधर्मांमुळे गुडघेदुखी, सांधेदुखीपासून झटपट सुटका मिळते गुडघेदुखी, सांधेदुखीपासून सुटका करुन घेण्यासाठी मोहरीचं तेलंही फायदेशीर ठरतं अननसामध्ये गुडघेदुखीपासून आराम देणारे गुणधर्म असतात अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून खाल्यानं गुडघेदुखी दूर होईल. ओव्यामध्ये अॅन्टी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, याचं सेवन केल्यानं गुडघेदुखी दूर होईल लिंबू, संत्र्यामध्येही सांधेदुखी, गुडघेदुखी दूर करण्याचे गुणधर्म असतात