नातं टिकवणं हे दोन्ही जोडीदारांच्या हातात असतं. कारण कोणतंही नातं हे प्रेम आणि विश्वासाच्या पायावर उभं असतं.
निरोगी आणि आनंदी नात्यासाठी फक्त प्रेम आणि आपुलकीच पुरेसे नाही तर दोन्ही जोडीदार मानसिकदृष्ट्या निरोगी असणे देखील खूप महत्वाचे आहे.
मानसिक तणावाने ग्रस्त असलेल्या जोडीदाराची लक्षणं
पूर्वीपेक्षा जास्त राग
छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणे
तणाव आणि संघर्ष टाळण्यासाठी स्वत:हून अधिक कामाला प्राधान्य देणे
लैंगिक संबंधात रस नसणे.
जोडीदारासोबत जास्त बोलत नाही
ही सर्व लक्षणे खराब मानसिक आरोग्याकडे निर्देश करतात, म्हणून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तुमच्या जोडीदारालाही साथ द्या.