बदलत्या जीवनशैलीमुळे अपुऱ्या झोपेमुळे शरीराच्या कुरबुरी वाढत आहेत.

Image Source: pexels

वयानुसार माणसाच्या झोपेवर परिणाम होतो.

Image Source: pexels

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात अपुऱ्या झोपेमुळे महिलांना उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असल्याचे समोर आलं आहे.

Image Source: pexels

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या वार्षिक वैज्ञानिक सत्रात सादर करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार,

Image Source: pexels

रात्री सात तासांपेक्षाही कमी झोप उच्च रक्तदाब वाढवणारी ठरू शकते, असं सांगण्यात आलंय.

Image Source: pexels

संशोधकांना यात असेही आढळून आलंय की पुरुषांच्या तुलनेत महिलांना अपुऱ्या झोपेमुळे हा धोका अधिक असतो.

Image Source: pexels

सामान्य निष्कर्षानुसार आपल्याला दिवसातून 8 ते 9 तास झोप आवश्यक आहे.

Image Source: pexels

पुरुषांच्या तुलनेत ज्या महिला सात तासांपेक्षाही कमी झोप घेतात त्यांना उच्च रक्तदाबाच्या समस्या अधिक उद्भवल्याचे दिसले.

Image Source: pexels

पुरुषांच्या तुलनेत महिलांना उच्च रक्तदाबाचा धोका हा सात टक्के अधिक असल्याचे समोर आले.

Image Source: pexels

स्त्रियांना निद्रानाश, नैराश्य आणि चिंता या सर्व परिस्थितीचे निदान होण्याची अधिक शक्यता असते, ज्याचा निद्रेशी संबंध असतो.

Image Source: pexels