खराब जीवनशैलीमुळे लोक वाढत्या वजनाने त्रस्त झाले आहेत.
ॲपल टीने दिवसाची सुरुवात केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात.
ॲपल टी वजन कमी करण्यातच नाही तर कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यातही मदत करते.
लवंग, दालचिनी, लिंबाचा रस आणि टी बॅग यांच्या साहाय्याने तयार केलेला हा ॲपल टी वजन कमी करण्यात खूप फायदेशीर आहे.
यात खूप कमी कॅलरीज असतात, आणि फॅटचे प्रमाणही खूप कमी असते, त्याचा थेट परिणाम वजन कमी होण्यावर दिसून येतो.
यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स तुमच्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवते.
सफरचंद चहाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनशक्ती वाढवते.
सफरचंदाचा चहा पिऊनही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
सफरचंदामध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे सी आणि सोडियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
ऍपल टीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.