पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे त्वचेवर परिणाम होतो.
या ऋतूमध्ये त्वचेची योग्य काळजी नं घेतल्यास अनेक समस्या उद्भवतात.
काही उपाय तुम्हाला मान्सूनमध्ये त्वचेची योग्य काळजी घेण्यास मदत करतील.
मानसूनमध्ये त्वचेला स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील घाण आणि तेल दूर होईल.
पावसाळ्यातही त्वचेला मॉइस्चरायझरची गरज असते. मॉइस्चरायझर वापरल्यामुळे त्वचा ताजीतवानी राहते.
सूर्यकिरण त्वचेला हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे सनस्क्रीनचा वापर करणे गरजेचे आहे.
संतुलित आहार आणि पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी राहते आणि त्वचेसामबंधीत समस्या कमी होतात.
आठवड्यातून एकदा घरगुती मास्क आणि स्क्रब वापरा. हे त्वचेला पोषण देईल आणि मृत त्वचा काढून टाकेल.
ग्लिसरीन आणि गुलाबपाणी समप्रमाणात मिसळून चेहर्यावर लावा. यामुळे त्वचेला ताजेतवाने वाटेल.
मानसूनमध्ये त्वचेची योग्य काळजी घेतल्यास आपण पावसाच्या आनंदाचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतो.