भिजवलेले बदाम खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात.
दिवसातून फक्त दोन भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
बदाम भिजवल्याने त्यांचा पोत मऊ होतो ज्यामुळे ते पचायला सोपे जातात.
बदाम हे वनस्पती प्रथिने, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे एक चांगले स्त्रोत आहे. बदाम खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळता येतात.
भिजवलेल्या बादमामध्ये भरपूर प्रमाणात बायोटिन असते ज्यामुळे केस गळणे, कोरडे केस आणि केसांशी संबंधित अधिक समस्या दूर होतात.
भिजवलेले बदाम खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते.
भिजवलेल्या बदामामध्ये व्हिटॅमिन बी, हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम यांसारखे ऊर्जा वाढवणारे पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते.
भिजवलेले बदाम मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडने भरलेले असतात ज्यामुळे तुमची कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.
फायटिक ऍसिडने समृद्ध भिजवलेले बदाम आहारात समाविष्ट केल्याने कर्करोग होण्याची शक्यता कमी होते .
भिजवलेले बदाम पचायला सोपे असतात आणि त्यात असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.