सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याचा पर्याय निवडतात.
कधी ब्लिच तर कधी फेशियल असे अनेक पर्याय पार्लरमध्ये उपलब्ध असतात.
पण, बऱ्याचदा असं होतं की, आपल्याला पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही. अशा वेळी घरच्या घरी राईस फेशियल करून पाहा.
फक्त 15 मिनिटांत होणाऱ्या फेशियलमुळे चेहऱ्यावर एवढा ग्लो येईल की त्यानंतर तुम्ही स्वत:च घरच्या घरी हे फेशियल नियमितपणे कराल.
सुरुवातीला कच्चं दूध आणि मध यांच्या मिश्रणाने चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटांसाठी मसाज करा. यामुळे त्वचेवरचा मळ निघून जाईल आणि त्वचा छान हायड्रेटेड होईल.
यानंतर या मिश्रणात थोडे तांदळाचे पीठ टाका आणि त्याने चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटांसाठी मसाज करा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल.
हा फेसमास्क सुकल्यावर हलक्या हाताने चोळून काढून टाका.
यानंतर चेहरा धुवून घ्या आणि व्यवस्थित मॉईश्चराईज करा. चेहऱ्यावर खूप छान ग्लो येईल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.