केंद्र सरकारने 2015 साली हातमाग क्षेत्राला नवी ओळख मिळवून देण्यासाठी 'राष्ट्रीय हातमाग दिवस' साजरा केला जातो. भारत देश विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. या देशात अनेक वेगवेगळ्या कलांचा उगम होतो. यापैकी बऱ्याच कलांमध्ये प्राचीन इतिहास दडलेला आहे. भारताचा मुख्य आणि पूर्वापार चालत आलेला उद्योग म्हणून हातमाग व्यवसायाकडे पाहिले जाते. हातमागावर तयार करण्यात आलेल्या कपड्यांचा वापर भारत स्वातंत्र्यलढ्यात केलेला पाहायला मिळते. राजेशाही काळात काही काशिदाकामचा उल्लेख आढळतो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशात रेशीम उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. भारतात 150 वर्ष इंग्रजांच्या वर्चस्वामुळे या ऐतिहासिक उद्योगाला उतरती कळा लागण्यास सुरूवात झाली. हातमाग उद्योगाला चालना देण्यासाठी आणि या प्राचीन उद्योगाला पुन्हा उंचीवर आणण्यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )