मुली अनेकदा नखांवर नवीन रंगीत नेल पॉलिश लावतात.



नेल आर्ट डिझाईन्स बनवून आपल्या हातांचं सौंदर्य आणखी वाढवतात.



पण तुम्हाला माहित आहे का, या सुंदर नेलपॉलिशमध्ये कधीकधी हानिकारक केमिकल्स असतात जी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.



अनेक केमिकल नेलपॉलिशमध्ये आढळतात.



जसे की, फॉर्मल्डिहाईड, टोल्युईन आणि डिप्रोपाईल फॅथलेट.



त्यांचा सतत आणि दीर्घकाळ वापर केल्याने त्वचेची ऍलर्जी, सूज आणि लालसरपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.



नेलपॉलिश रिमूव्हर्स देखील हानिकारक रसायनांनी भरलेले असतात. त्यांच्या वापरामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.



याशिवाय, नेलपॉलिशमध्ये असलेली केमिकल्स श्वसन प्रणालीवर परिणाम करू शकतात.



त्यामुळे नेलपॉलिश लावताना किंवा काढताना मास्क घालणे महत्त्वाचे आहे.



नेलपॉलिश केमिकल गर्भवती महिलांसाठी आणखी धोकादायक असू शकतात



टोल्युईन, फॉर्मल्डिहाईड आणि डायथिल फॅथलेट सारखे केमिकल्स नेलपॉलिशमध्ये असतात.



ही रसायने मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतात.