दिवसाची सुरुवात ड्रायफ्रूट्स खाऊन करत असाल, तर ते शरीरास चांगले असते. ड्रायफ्रूट्समध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अशी काही संयुगे असतात. तुमची कोलेस्ट्रॉल पातळी कमी करतात. भिजवलेले काजू तुमची ऊर्जा वाढवतात. भिजवलेले बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. सुका मेवा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला आहे. अक्रोड आणि बदाम मुक्त रॅडिकल्स दूर करण्यास मदत करतात. पाईन नट्समुळे रक्ताची कमतरताही भरुन निघते. काजू खाण्याची योग्य वेळ सकाळी आहे. रात्रभर भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्यास त्याचा फायदा आणखी वाढतो.