अति आर्द्रतेमुळे हवामान चिकट असल्याने पावसाळ्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.
यामुळे कोंडा, केस गळणे, स्प्लिट एंड्स यासारख्या समस्या निर्माण होतात.
पावसाळ्यात निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे. आहारात ताजी फळे आणि पलेभाज्यांचा समावेश करावा.
केस धुतल्यानंतर ते जास्त काळ ओले ठेऊ नका तसेच, केस सुकविण्यासाठी तुम्ही मऊ टॉवेलचा वापर करू शकता.
पावसाळ्यात हेयर स्पा करणे फायदेशीर ठरते. हेयर स्पा तुमच्या स्कॅल्प आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
केस गळणे आणि स्प्लिट एंड्स टाळण्यासाठी महिन्यातून एकदा केस ट्रिम करावेत.
पावसाळ्यात बाहेर जाताना नेहमी हेअर सीरम किंवा लीव्ह-इन कंडिशनरचा वापर करावा यामुळे केस हायड्रेटेड राहतात.
या ऋतुत सौम्य शैम्पूने दर 2-3 दिवसांनी केस धुतल्यास, केस निरोगी राहतात.
घराबाहेर पडताना, केस भिजण्यापासून वाचवण्यासाठी नेहमी पोनीटेल किंवा बनमध्ये बांधा.
पावसाळ्यात हेअर स्टाइलिंग उत्पादनांचा वापर कमी करा यामुळे केस कोरडे होतात आणि तुटतात.