लग्नानंतरचा काळ हा स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा असतो.
लग्नानंतर प्रत्येक पुरूष आणि स्त्री दोघांचे आयुष्य बदलतं.
लग्नानंतरच्या आयुष्याचा परिणाम सर्वात जास्त स्त्रीला जाणवतो.
लग्नानंतर प्रत्येक मुलीला माहेरची आठवण येते.
आठवण येण्याचं पहिलं कारण म्हणजेच घराच्या जबाबदाऱ्या सांभाळणं.
लग्नानंतर सासुरवाडीत प्रत्येक काम काळजीपूर्वक करावं लागतं.
लग्नाआधी घरातली सर्व कामं आपले आई-बाबा पार पडतात.
परंतु लग्नानंतर एकटीवर जबाबदारी पडल्याने मुलींना माहेरची आठवण येते.
लग्नानंतर स्वतःहून सकाळी लवकर उठावं लागतं.
लग्न झालं की स्वयंपाकाची जबाबदारी अंगावर पडते आणि स्वयंपाक शिकावा लागतो. लग्नानंतर मुलींना आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.