पण, अनेकदा प्रश्न पडतो की, थंडीत पपई खाणं फायदेशीर ठरतं की, नाही?
पपईमध्ये अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात...
पपईचा स्वभाव उष्ण असतो आणि ती खाल्ल्यानं शरीर आतून उबदार राहते.
पपई शरीरात उष्णता निर्माण करते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते
पपई खाल्ल्यानं यकृत आणि आतड्यांचं कार्य सामान्य राहतं आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ डिटॉक्सिफाईड होतात.
त्यामुळे हिवाळ्यात पपई खाणं आरोग्यासाठी लाभदायक ठरतं.
पोटाच्या समस्यांवर पपई अत्यंत लाभदायी ठरते.
पोटाचे आजार, अपचन, गॅस, छातीत जळजळ यांसारख्या समस्यांवर पपई लाभदायी ठरते.
अस्थमाचा त्रास असेल तर त्यावरही पपई गुणकारी ठरते.
व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन फुफ्फुसातील जळजळ टाळण्यास आणि कमी करण्यास मदत करतात.
धूम्रपान करणाऱ्यांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे, कारण पपईचा रस फुफ्फुसातील जळजळ कमी करतो आणि दम्याचा त्रास टाळतो.
पपई हाडांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
संधिवात आणि ऑस्टियोआर्थराइटिस यांसारख्या समस्यांवर पपई प्रभावी मानली जाते.
पपईमध्ये आढळणारं एक एन्झाईम, ज्याला chymopapain म्हणतात, हाडांची घनता आणि ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.