भारतात असं एक गाव आहे, ज्या गावातून थेट स्वर्गलोकात जाता येतं... तुम्हाला नाही माहिती ? खरंच, या गावातून जाणारा रस्ता थेट स्वर्गलोकात जातो, असं सांगितलं जातं. असे म्हणतात की, माणसाला त्याच्या कर्मानुसार स्वर्गात किंवा नरकात स्थान मिळतं. भारतातील स्वर्गाचा मार्ग जाणून घेण्याआधी त्यामागील एक पौराणिक कथा जाणून घ्यावी लागेल. महाभारताच्या युद्धानंतर, जेव्हा पाच पांडव आपली पत्नी द्रौपदीसह संन्यास घेऊन तपश्चर्या करण्यासाठी राजवाड्याऐवजी हिमालयात आले, तेव्हा स्वर्गाच्या दिशेनं होणाऱ्या त्यांच्या शेवटच्या प्रवासात प्रत्येकाला आळीपाळीनं आपल्या कर्माचं फळ मिळू लागलं. युधिष्ठिर सोडून कोणीही जिवंत राहिलं नाही. असं मानलं जातं की, युधिष्ठिरासोबत एक कुत्रादेखील होता, जो स्वर्गाला जाणाऱ्या मार्गानं स्वर्गात पोहोचला होता. दरम्यान, भारतातील स्वर्गाचा मार्ग उत्तराखंड राज्यातील चमोलीमधून जातो. जिथे कथितपणे स्वर्गाचा मार्ग आहे. ज्याला लोक स्वर्गाचा जिना देखील म्हणतात. या स्वर्गरोहिणी गावाचं नाव 'माणा' असं आहे, ज्याला पूर्वी भारतातील शेवटचं गाव म्हटलं जात होतं, परंतु आता ते भारतातील पहिलं गाव आहे.