चुंबनामुळे इन्फ्लूएन्झा, श्वसनाचे आजार किंवा फ्लू सारख्या समस्या देखील होऊ शकतात.
यामध्ये स्नायू दुखणे, घशातील संसर्ग, ताप यांसारखी लक्षणे दिसतात.
चुंबनामुळे नागीणची समस्या देखील होऊ शकते. नागीण व्हायरसचे दोन प्रकार आहेत.
HSV1 आणि HSV2. आरोग्य अहवालानुसार, HSV 1 विषाणू चुंबनाद्वारे सहजपणे पसरू शकतो.
तोंडात लाल किंवा पांढरे फोड येणे ही त्याची सर्वात प्रमुख लक्षणे मानली जातात.
जर तुमच्या जोडीदाराला हिरड्या आणि दातांची समस्या असेल तर किस केल्याने तुम्हालाही ही समस्या होऊ शकते.
चुंबन घेताना निरोगी व्यक्ती लाळेच्या माध्यमातून बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यास हिरड्यांमध्ये सूज येऊ शकते.