सध्या छोट्या छोट्या गोष्टींवरून ब्रेकअप होतात.
ज्या व्यक्तीबरोबर आपण आयुष्यभर राहण्याची स्वप्न बघतो ती व्यक्ती जर अर्धा आयुष्यातून सोडून जात असेल तर असह्य वेदना होतात.
या पाच सवयी ब्रेकअप होण्यास कारणीभूत ठरतात.
शक्यतो आपण या सवयी आणि गोष्टी टाळायला पाहिजे.
नात्यात संशय निर्माण झाला की प्रेमाचा पाया डळमळीत होतो. तसेच त्याच्या पुरेपूर अभ्यास न करता त्याची योग्य ती शहानिशा न करता त्या व्यक्तीवर संशय घेतला जातो. अनेकजण सोशल मीडियावरुन आपल्या पार्टनरची हेरगीरी करतात.
आपला स्वभाव अनेक अडचणींना ओढून घेत असतो. अहंकारी स्वभावामुळे आपण अनेक अडचणींना आमंत्रण देत असतो. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला पाहिजे.
जास्त अपेक्षा असतील तर माणसांना मन मोकळेपणाने जगता येत नाही. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर व्यक्ती नाराज होतो आणि त्याला दुःख देखील होते.
ब्रेकअप मध्ये वाद विवाद चर्चेचा विषय असतो. सार्वजनिक ठिकाणी किंवा भर रस्त्यामध्ये शक्यतो वाद विवाद करू नये.
विश्वासघात हे ब्रेकपसाठी पुरेसे कारण असते. नात्यातल्या प्रेमाला तुच्छतेने देखले गेले की नाते स्वतः संपते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.