दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यात भरपूर पोषक असतात. दुधामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 2 अशी जीवनसत्त्वे असतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. नियमितपणे दुधाचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकरक शक्ति मजबूत होते. सकाळी दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते व स्नायूही मजबूत होतात. मात्र ज्यांना लैक्टोजची समस्या आहे त्यांना पोटदुखी, डायरिया आणि गॅसची समस्या होऊ शकते. नेहमी नाश्ता केल्यानंतर दूध प्यायले तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला हृदयविकार असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी नाही तर रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे योग्य आहे. रात्री दूध प्यायल्याने झोप चांगली लागते आणि गरम दुधात हळद मिसळून प्यायल्यानेही आरोग्य सुधारते. तुम्ही सकाळचे दूध पिऊ शकता, पण रिकाम्या पोटी पिऊ नका.