भगवान शंकराला समर्पित श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात.
उपवासाच्या काळातील आहार कसा असावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
यंदा श्रावण महिन्यात 5 श्रावणी सोमवार आले आहेत.
उपवासाच्या काळात अशा आहारांचा समावेश करा, जे खाऊन दिवसभर तुम्ही उत्साही राहू शकाल.
एक वाटी फळ खाल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
फळामध्ये भरपूर फायबर असल्याने तुमचे पोट दिर्घकाळासाठी भरलेले राहते.
सुका मेव्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक असतात.
सुका मेव्यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
तसेच तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसचाही समावेश करु शकता.
उपवासामध्ये साबुदाणा या पदार्थामध्ये विविध पोषणतत्व असतात.
उपवासा दरम्यान सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे शिंगाड्याचे पदार्थ.
शिंगाडा हे पदार्थ शरीरातील ऑक्सिडेटिव्ह कमी करते.
श्रावण मासात उपवासात तुम्ही तुमच्या आहारात नारळाचा अनेक प्रकारे समावेश करू शकता.
श्रावण महिन्यात जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
महाराष्ट्रात 5 ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात होणार आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )