आजकाल मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकजण रात्रंदिवस मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर चिकटून राहतो.
यामुळे डोळे खराब होण्याची आणि दृष्टी कमी होण्याची समस्या निर्माण होते.
जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींनीही दृष्टी कमी होऊ शकते.
झिंक, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बीटा कॅरोटीन समृध्द अन्न खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित जोखीम 25% कमी होऊ शकतात.
ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, झेक्सॅन्थिन, ल्युटीन आणि बीटा कॅरोटीन हे देखील डोळ्यांसाठी उत्तम अन्न आहेत.
नट आणि बीन्समध्ये ओमेगा-३ तसेच व्हिटॅमिन ई आणि फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही अक्रोड, काजू, शेंगदाणे खाऊ शकता.
लिंबूवर्गीय फळे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मुबलक प्रमाणात आढळतात, पालक, कोबी, मेथी, गाजर यांसारख्या भाज्या खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात आणि दृष्टी टिकून राहते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंडी एक उत्कृष्ट अन्न मानले जाते. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि झिंक देखील मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला प्रथिने मिळतात.
मासे खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. फिश ऑइल डोळ्यांच्या कोरडेपणापासून बचाव करते.