असं म्हणतात, रडल्याने मन मोकळं होतं. जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून वारंवार रडत असाल तर ते तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. तणावग्रस्त व्यक्तीला राग येणे, वाद घालणे आणि नंतर रडणे या गोष्टी पूर्णपणे सामान्य आहे. रडणे ही जैविक प्रक्रिया असली तरी वारंवार रडल्याने केवळ मानसिक आरोग्यालाच हानी पोहोचत नाही तर त्वचेवरही परिणाम होतो. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, वारंवार आणि सतत रडल्याने त्वचेचे नुकसान होते. त्यांच्या मते, रडण्यामुळे नाक, चेहरा आणि डोळ्यांजवळील रक्तवाहिन्या रुंद होतात. चेहऱ्यावर सूज आणि लालसरपणा वाढू लागतो. त्वचेची पीएच पातळी असंतुलित होते. रडल्यानंतर अश्रू पुसण्यासाठी सारखा रुमाल वापरल्याने त्वचा ब्रेकआऊटचा धोका असतो. वारंवार रडल्याने शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते.