मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अनेक महत्वाचे आणि शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वांचा समावेश असतो. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये खनिजांचे प्रमाण जास्त असते. मोड आलेले कडधान्यांमध्ये तुम्ही सर्व कडधान्यांचा समावेश करू शकता. मोड आणाऱ्या कडधान्यांमध्ये मूग, मटकी,चवळी, हरभरा, वाटाणा यांचा समावेश करू शकता. मोड आलेले कडधान्य हे पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. मोड आलेली कडधान्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकरक शक्ती वाढण्यास मदत होते. मोड आलेली कडधान्याच्या सेवनाने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य नियंत्रण ठेवण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणून मोड आलेल्या कडधान्याकडे पहिले जाते. अतिशय उच्च घटकपोषण मूल्यांसाठी मोड आलेले कडधान्य फायदेशीर आहे. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )