काही जण तोंडाला, हाताला, पायाला सारखे मॉइश्चरायझर लावत असतात. कोणत्याही ऋतुत सारखं मॉइश्चरायझर लावण्याची सवय असते. मॉइश्चरायझरच्या अतिवापरामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. जास्त मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेची छिद्र बंद होतात. त्वचा खूप कोरडी किंवा तेलकट होऊ शकते. त्वचेच्या रंगावरही परिणाम होऊ शकतो आणि त्यावर धूळ सहज चिकटते. जास्त मॉइश्चरायझर वापरल्याने चेहरा चिकट होतो. तसेच ओव्हर मॉइश्चरायझिंगमुळे चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य हळूहळू नष्ट होऊ लागते. यासोबतच त्याचा जास्त वापर केल्याने केवळ चेहऱ्याच्या त्वचेवरच नाही तर संपूर्ण शरीरावर मुरुमांची समस्या उद्भवते. आपल्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे आपली त्वचा निर्जीव दिसू लागते.