वजन कमी करताना आहारात फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
फळांमध्ये असलेले पोषक घटक, उच्च फायबर आणि प्रथिने वजन कमी करण्यास मदत करते.
द्राक्ष वजन कमी करण्यास मदत करते, यामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते.
सफरचंदांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते,यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि यामध्ये कॅलरीचे प्रमाणही कमी असते.
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, वजन कमी करण्यासाठी रोज एक संत्री खावी.
नाशपती तुमची पचनसंस्था सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
पपईमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते. रोज पपईचे सेवन केल्याने वजन कमी होते.
अननसात जीवनसत्वे आणि खनिजे असतात. अननस पचनास मदत करते आणि आणि अतिरक्त चरबी कमी करते.
किवी हे वजन कमी करणारे सुपरफूड मानले जाते.
चेरीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात हे हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि पोटाची चरबी कमी करण्यास प्रोत्साहन देतात.